प्रत्येक
मानवात चांगुलपणा असतोच
त्याला
हाक मारायची असते
प्रत्येकामध्ये
देवत्व हे वास करतेच
त्याला
साद घालायची असते
एरवी
माझे तुझे करत भांडणारी
माणसे
आपले
म्हटले की एकत्र येतात
मी
काय करू एकटा,
म्हणत
रडणारे हात
दिशा
दाखवली तर हजारो होतात
सरत्या
वर्षाने असे अनेक अनुभव
दिले
अनोळखी
होते ते एका हाकेवर
नातलग
झाले
तुमच्या
सहकार्याशिवाय काहीच शक्य
नाही
तुमची
साथ असेल तर काहीच अशक्य
नाही
रस्ता
फार मोठा आहे,
आपण
चालत राहूया
मानवता
हाच धर्म आहे,
आपल्या
कृतीतून सांगूया
2018
मध्ये
हात दिलात,
2019
मध्येही
द्याल ही खात्री आहे
माणसाला
माणूस जोडायची आमची साखळी
आहे!
— आरती
भार्ज,
वुई
टुगेदर ग्रुप,
ठाणे