जगण्यावर
मनापासून श्रद्धा असली
पाहिजे
कुठल्याही
कामावर प्रामाणिक निष्ठा
पाहिजे
स्विकारलेल्या
नात्यावर आपली आस्था पाहिजे
मग
पूजा केली नाही तरी चालेल
भुकेल्या
कुत्र्याला खाऊ घातले
पाहिजे
उन्हात
पक्ष्यांना पाणी दिले
पाहिजे
झाडांना
जवळ केले पाहिजे
मग
नेवैद्य दिला नाही तरी
चालेल
अडलेल्याला
वाट दिली पाहिजे
नडलेल्याला
हात दिला पाहिजे
एकदा
आपले म्हटले कुठल्याही
नात्यात
की साथ दिलीच पाहिजे
मग
देवळात नाही गेले तरी चालेल
तसाही
सगळा टाईमपासच आहे
तरीही
नेटका खेळला पाहिजे
प्रत्येक
क्षण असोशीने जगायला पाहिजे
माणसाने
माणूस बनायला पाहिजे
मग
देव भेटला नाही तरी चालेल
— आरती
भार्ज,
वुई
टुगेदर ग्रुप,
ठाणे