शाळा आणि वुई टुगेदर धान्य बँक

” शाळा” काय असते आपल्या सगळ्यांसाठी? आपली शाळा  आखः जग  असते आपल्यासाठी.
शाळा जिथे संस्कार घडतात, त्यातून प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून घडत जातो नकळत याच वयातले संस्कार आपल आयुष्य आधिक सुंदर करतात म्हणूनच वुई टुगेदर ग्रुपने शाळांमधून धान्य कलेक्शन करायच ठरवले. त्याचा उद्देश मुलांना सामाजिक जाणीव असावी, समाजभान यावं हाच आहे.
त्या निमत्ताने ठाण्यातील शाळांमध्ये जाण्याचा, मुलाशी सवांद साधण्याचा योग आला. बाल वयातील किलबिल, तोच निरागसपणा, उत्साह अनुभवता आला. मूले लहान असली तरी योग्य पद्धतीने संवाद साधल्यावर  त्यांना ही समाजभान आहे हे त्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादातून दिसून आले.
आता पर्यंत वुई टुगेदर ग्रुपने बेडेकर विद्यामंदिर, सरस्वती मराठी प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल, भगवती   हायस्कूल, आनंद विश्व गुरुकुल, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये धान्य कलेक्शन झाले आहे.
या सगळ्याच शाळा चालकांनी आणि पालक आणि विद्यार्थी वर्गाने उदंड प्रतिसाद देऊन आमच्या प्रयत्नांना यश दिले. 
आम्हाला अधिकाधीक गरजू सस्थांपर्यंत पोचता आले, त्यासाठी वुई टुगेदर ग्रुप त्यांचा ऋणी आहे. 
हे धान्य कलेक्शन करातना आम्हालाही थोडस बालपण जगता आले, प्रत्येकानं आम्हाला खूप मनापासून मदत करण्याचा प्रयत्न केला.
काही हृदयस्पर्शी अनुभव आले, एकदा आमच्या बॅग मध्ये धान्य थोडेसेच देता आले म्हणून आम्हाला १०रू सापडले, तर एका बॅगेत बिस्कीट पुडा! याचाच अर्थ आपल्या जवळ जे काही आहे ते शेअर करावंस वाटल यात खूप काही आलं!
आज धान्य कलेक्शन फक्त धान्य देण्यापर्यंत न राहता ते समाजभान देणारे आणि शेअरिंगचे महत्त्व पटवून देणारे अभियान ठरलं आहे याचे समाधान आहे.

कित्येकदा मुले विचारतात, ‘बाई उद्यापण आणू?’, आम्ही हसून नाही सांगतो, एकदा बस. तेव्हा त्या निरागस दातृत्वास मनातल्या मनात नमस्कार करतो. देव अशी बुद्धी सर्व मोठ्या माणसांनाही देवो, जेणेकरून कुणावरही भुकेले राहण्याची वेळ येणार नाही!

—- कल्याणी काळे, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *