नुकताच बीड येथील सेवश्रम या सस्थेला भेट देण्याचा योग आला. तमाशा कलाकरांच्या मुलांसाठी सुरेश दादा (सुरेश राजहंस) काम करतात.
खूप अगत्याने त्यांनी आमचे स्वागत केले. संस्थेत प्रवेश करताच डोळ्यात भरते ती त्यांची इंग्रजी माध्यमाची डिजिटल शाळा. आकर्षक रंगांनी सजवलेली रंगीबेरंगी फुलपाखरा सारखी…आणि तिथल निरागस बालपण.
खरं तर तमाशात सादर होणाऱ्या लावणीला आपण महाराष्ट्राची शान म्हणतो. महाराष्ट्राची अस्सल लोककला म्हणून भरजरी वस्त्र दिमाखात मिरवते ती लावणी. परंतु हीच लावणी सादर करणाऱ्या कलावंतांच्या व्यथा,वेदना आपण नाकारतो. समाजाच्या मुख्यप्रवाहा पासून दूर ठेवतो. अत्यंत अस्थिर असं आयुष्य जगणाऱ्या कलावंताच्या नशिबी तर उपेक्षितांचे जिणे येते !
अशा मुलांसाठी सुरेश दादाना काम करावस वाटल म्हणून त्यांचे खूप कौतुक वाटले. या संस्थेत येणाऱ्या मुलांनवर अगदी प्राथमिक संस्कार करावे लागतात, कारण धड कुटुंब नाही,संस्कार नाही,शाळा तर पाहिलीच नाही अशा वातावरणातून ही मूल येतात, सुरेश दादा आणि त्यांच्या पत्नी मयुरी ताई त्याना माया, प्रेम, शिस्त लावून वाढवतात. त्यांचं निरागस बालपण जपतात. वेळप्रसंगी सुरेश दादा स्वतःच नावही या मुलांना देतात.
म्हणूनच सुरेश दादांचं ‘राजहंस’ असणेआपल्याला पटते. We Together group दादांच्या पाठीशी कायम अभिमानाने उभा आहे आणि सदैव राहील, याची मला खात्री आहे.
कल्याणी काळे, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे