वर्ष २०१८… पहिली भिशी आम्हाला लागली – मला आणि माझी मैत्रीण मनीषा कदम हिला.
भिशीच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या सोसायटीतल्या मैत्रिणीच्या सोबतीने भिशिला नवं स्वरूप द्यावं असं दोघींच्याही मनात होत.
खूप जगलो स्वतःसाठी आता समाजाचे ऋण मान्य करून छोट्या स्वरूपात का होईना त्याची थोडी उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी मनापासून ही इच्छा होती.आणि म्हणतात ना pure intention makes a difference!
तसच झालं काहीस आमच्या ग्रुपमधल्या विदुला ताईंनी एक forward post वाचायला दिली. ती पोस्ट होती we together ग्रुप कडून आलेली -Give your Raddi for my food.
Post वाचून संण्यापूर्वीच आम्ही दोघी म्हणालो आम्ही करतो हे काम ! त्या नंतर आम्ही सोसायटीत प्रत्येक घरी जाऊन ही कल्पना सांगितली.
खूप छान प्रतिसाद सोसायटी कडून आला. जवळ जवळ ८० टक्के लोक त्यांची रद्दी आम्हाला द्यायला तयार झाले. जानेवारी पासून कामाला सुरुवात झाली.
मार्च मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्याने उज्वला बागवाडे यांना बोलावलं, सोसायटीच्या नावाने ७००० रू रद्दी देऊन जमा झालेलं द्यायाचे ठरले. परंतु दुर्देवाने उज्वला ताईची तब्येत बिघडली म्हणून त्यांना Jupiter hospital मध्ये admit केल्याचा फोन आला. वाटले .. नाही येऊ शकणार उज्वला ताई त्या दुसऱ्या कुणाला पाठवतील. पण नाही, उज्वला ताईचा फोन आला “मी येतेय, डॉक्टरांची परवानगी घेऊन”. त्या चक्क कार्यक्रमाला हजर झाल्या.
त्यांचं dedication बघून थक्क झालो. त्यांचं मनोगत ऐकून खरंच समाजाला काहीतरी भरीव योगदान दिलं पाहिजे हे लक्षात आले. त्यांनी धान्य बँकेची संकल्पना समजाऊन सांगितली आणि आपण गृहिणी आहोत म्हणूनच खूप काही करू शकतो हे त्यांनी लक्षात आणून दिले.
जून मध्ये आम्ही दोघी मैत्रिणी we together group मध्ये join झालो. तिथे भेटलेल्या प्रत्येकीने आम्हाला सामावून घेतले. सुरवातीला १० मेंबर करायचे धान्य बँकेचं एवढंच टास्क होत ते ही आपले घरचे मेंबर नातेवाईक किवा घरातले, सख्खे म्हंजे दुसरं कोणी नाहीतर आपल्या सोसायटीतलीच कुटुंब याचा प्रत्यय सोसायटीतील सभासदांनी दिला.
आज जवळपास सगळेच सभासद धान्य बँकेचे सदस्य आहेत वा देणगीदार आहेत. सगळ्यांनी आमच्या कामाचं कौतुक करत भरीव पाठिंबा दिला. सोसायटीत नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात फनफेअर मध्ये आम्हाला स्टॉल लावायची संधी दिली. स्टॉलला भेट देऊन we together group चे कार्य समजून घेतले आणि फक्त ३ तासात २०,००० रू. जमा झाले !
आम्ही हे काम करतो याचा सोसायाटीला अभिमान आहे अशी भावना सगळ्या सदस्यांनी व्यक्त केली. छोटया बच्चे कंपनीने तर कमालच केली, त्यांच्या खाऊचे पैसे त्यांनी contribute केले धान्य बँकेसाठी! सलाम त्यांच्या दातृत्वाला!
या सर्व वास्तू शिल्प सभासादांचे आम्ही व्यक्तिशः ऋणी आहोत. तसेच we together group त्यांचा कायम ऋणी राहील.
कल्याणी काळे, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे