शांतिवन : दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथेकर माझे जुळती

वुई टूगेदर ग्रुप मध्ये आल्या पासूनच  शांतीवनला जायचं प्रत्येकीच्या मनात होतच, उज्वला ताईकडून खूप ऐकल होत. म्हणूनच पटकन १७ जणी तयार झाल्या. प्रत्येकीला दिपक दादा आणि कावेरी ताईंना भेटायचं होतं, प्रकल्प बघायचा होता. मग काय  निघाल्या साऱ्याजणी मिळून शांतीवनला ८ तासाचा प्रवास करून पोचलो, ४वाजता!

पाऊल टाकताच जाणवलं ते स्वच्छ, प्रसन्न करणार आनंदी वातावरण. कावेरी ताईंनी खूप प्रेमाने आपलेपणाने स्वागत केलं समोर किलबिलणारं निरागस बालपण बघून थकवा पार पळून गेला.मुलांचा उत्साह ,त्यांचं मोकळं वागणं ,बोलणं त्यातील सहजता मनाला भिडत होती जणू काही दिपक दादा आणि कावेरी ताईंनच्या परिश्रमाची,प्रेमाची साक्ष देत होतीइवलेसे रोप लावियले दारी त्याच वेलू गेला गगनावरी स्वर्गीय बाबा आमटेंच्या कामापासून प्रेरित  झालेल्या दिपक दादांनी कावेरी ताईंच्या साथीने लावलेल्या एका रोपट्याचा आज  वटवृक्ष झालं आहेअनेक अनाथ ,वंचित ,उपेक्षित  जगण्याचा आधार झालं आहेपरंतु हे उपेक्षित पण कुठेच जाणवत नाहीसगळी कडे एक आनंद भरून उरला आहे त्यांच्या आऊष्यात त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक वळण मिळाले आहे.हा ऊर्जेचा स्रोत पुरवणार  नागरगोजे दाम्पत्य आणि त्यांचे सहकारी या साठी अविरत झटत आहेत.या साठी वेगवेगळ्या पातळी वर संघर्षाचा सामना करून जिद्दीने उभे आहेत . कामावरची अढळ श्रद्धा , प्रामाणिकपणा त्यांच्या बोलण्यात सतत जाणवत राहते.इथे असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे.तारांगण प्रकल्पा द्वारे दहावी नंतरच्या मुलांच्या स्वप्नांना आकार देऊन ती मुले स्वावलंबी होई पर्यंत त्यांना भक्कम आधार दिला जातोय.

एवढ्यावरच हे दांपत्य थांबत नाही  स्वतः स्वयंपूर्ण होतानाच ते गावातील शेतकऱयां साठी शेतकरी मनोबल प्रकल्प राबवतात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.आज पर्यंत ५० शेतकरी ह्या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. त्यांच्या हिरव्या फळबागा बघताना या दामपत्या विषयी चा आदर अधिक वाढतो.खरं तर लीहिण्या सारखा खूप आहे पण या निमितताने मला दादांसाठी सुरेश भटांच्या चार ओळ आठवत आहेतआयुष्य छान आहे थोडे लहान आहेरडतोस काय वेड्या लढण्यात शान आहेकाट्यात ही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहेजगणे  निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला ही उंचावरून पडावं लागतं.

दीपक दादा आणि कावेरी ताई ह्यांच्या कार्याला माझा मनापासून सलाम.

कल्याणी काळे, वुई टुगेदर ठाणे

ReplyForward

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *