शांतीवन ‘घे उंच भरारी’

उंच भरारी घेण्या ताकद मनात हवी
जिद्द आणि चिकाटीने किर्ती चहुकडे व्हावी
तुमचं जगणं व्हावं प्रकाशमान, दिवा उद्याच्या पिढीला
वाटते आपला प्रवास असाच हवा!

मनात इच्छा असेल तर काही अशक्य नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शांतिवन. सुंदर ,शांत आणि स्वच्छ असा हा परिसर, दुष्काळग्रस्त भागात एवढा हिरवा परिसर, नवल वाटले आणि त्याच जोडीला तिथे असणारी हसरी मुले … मन खुप भारावून गेले.
मामा-मामीच्या घरात शिस्तबद्ध ,संस्कारक्षम आणि आनंदी वातावरणात ही मुले रमली आहेत. अनाथ, वंचित आणि उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांचे संगोपन करणे कीती मोठी गोष्ट आहे, हे कसे जमते? कुठून मिळते एवढी शक्ती आणि उर्जा ? मला कोडे पडले.
शांतीवनच्या कार्याविषयी व दिनक्रमाविषयी दीपकदादा व ताईशी बोलत असतांना मन थक्क झाले. बीडसारख्या दुष्काळग्रस्त भागात पाण्याबरोबर शिक्षण क्रांती घडवून आणण्याचे काम, पाऊस नाही, पाणी नाही, लाईट नाही … ह्या सर्व परिस्थितीना मात करून सर्व योजना शासकीय नियमांचे पालन करून राबवल्या जातात आणि जिद्द असेल तर दगडाला पण पाझर फुटतो ह्या म्हणीचा प्रत्यय शांतीवनला जाऊन मिळाला.

शांतीवन सारख्या सेवेला वाहून घेतलेल्या संस्थेबरोबर काम करण्याचे भाग्य मला “वुई टुगेदर धान्य बँकेमुळे” मिळाले याचा मला खुप अभिमान वाटतो.
शांतिवनचा पसारा वाढत आहे, त्यांच्या ह्या प्रवासात “We together Grain Bank” बरोबर राहण्याचा सदैव प्रयत्न करत राहिल.

मनिषा सूर्यवंशी, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *