आम्ही सगळ्याच वेड्या…धान्य मागणाऱ्या !

आम्ही सगळ्याच वेड्या ….
कुणी दुःखी दिसले आम्हाला पाहवत नाही, कुणी भुकेले असेल आम्हाला राहवत नाही…

मनात आधीपासूनच बीज होते, पण नक्की काय करावे समजत नव्हते…
कुणा एका वेडीने मग स्वप्न पाहिले, अनेकींनी ते उराशी बाळगले….
आता जो दिसेल त्याला आम्ही धान्य मागत फिरतो, ज्यांना आपल्यासारखे भाग्य नाही अशांच्या मुखी घास भरवतो.

कुणी म्हणतात पुण्याचे काम, कुणी बोलतात ‘बायकांना कामधंदा नाही, म्हणून चालल्या’….
कोण काय म्हणते आम्हाला पर्वा नाही, रस्ता किती मोठा आहे आम्हाला काळजी नाही.

कुणीही भुकेले झोपू नये, यासाठी आम्ही चंगच बांधलाय, त्यासाठी स्वतःच्या जेवणखाण्याच्या वेळांचीही आम्हाला शुद्ध नाही..

प्रार्थना एवढीच आहे, तुमचे हात येऊ देत मदतीसाठी हाती…
मिळून साऱ्याजणी उभारती धान्यांच्या राशी, वंचिता मुखी घास भरवती !

Journey of a dream..from 'Me' to 'We'
1st March 2019 Event, Sahyog Mandir Ghantali Thane, supported by hundreds of kind hearted citizens of Thane and Mumbai

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *