Uncategorized

आम्ही सगळ्याच वेड्या…धान्य मागणाऱ्या !

आम्ही सगळ्याच वेड्या …. कुणी दुःखी दिसले आम्हाला पाहवत नाही, कुणी भुकेले असेल आम्हाला राहवत नाही… मनात आधीपासूनच बीज होते, पण नक्की काय करावे समजत नव्हते… कुणा एका वेडीने मग स्वप्न पाहिले, अनेकींनी ते उराशी बाळगले…. आता जो दिसेल त्याला आम्ही धान्य मागत फिरतो, ज्यांना आपल्यासारखे भाग्य नाही अशांच्या मुखी घास भरवतो. कुणी म्हणतात पुण्याचे …

आम्ही सगळ्याच वेड्या…धान्य मागणाऱ्या ! Read More »

शांतीवन सेवाश्रम भेट आम्हा प्रेरणादायी !

तरुण वयात माणसाने स्वप्न पहावे स्वतःच्या सुखी संसाराचे… नोकरी धंदा करून धडाक्यात खूप पैसे मिळवण्याचे, मजेत जगण्याचे!पण एका तरुण जोडप्याने मात्र ठरवले दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याचे…स्वतःचा संसार सोडून जगाचा संसार करण्याचे, वंचितांचे भविष्य घडवण्याचे ना ओळख ना पाळख, जे मूल आले त्याचे हे दोघे पालक झाले, ज्यांना जन्मदात्यांनी झिडकारले अशांना यांनी जीव लावले, मोठे केलेस्वतःच्या मिठभाकरीची …

शांतीवन सेवाश्रम भेट आम्हा प्रेरणादायी ! Read More »

शांतीवन ‘घे उंच भरारी’

उंच भरारी घेण्या ताकद मनात हवी जिद्द आणि चिकाटीने किर्ती चहुकडे व्हावीतुमचं जगणं व्हावं प्रकाशमान, दिवा उद्याच्या पिढीला वाटते आपला प्रवास असाच हवा! मनात इच्छा असेल तर काही अशक्य नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शांतिवन. सुंदर ,शांत आणि स्वच्छ असा हा परिसर, दुष्काळग्रस्त भागात एवढा हिरवा परिसर, नवल वाटले आणि त्याच जोडीला तिथे असणारी हसरी …

शांतीवन ‘घे उंच भरारी’ Read More »

तो राजहंस एक…..सेवाश्रम भेटीनंतरचे मनोगत

नुकताच बीड येथील सेवश्रम या सस्थेला भेट देण्याचा योग आला. तमाशा कलाकरांच्या मुलांसाठी सुरेश दादा (सुरेश राजहंस) काम करतात. खूप अगत्याने त्यांनी आमचे स्वागत केले. संस्थेत प्रवेश करताच डोळ्यात भरते ती त्यांची इंग्रजी माध्यमाची  डिजिटल शाळा. आकर्षक रंगांनी सजवलेली रंगीबेरंगी फुलपाखरा सारखी…आणि तिथल निरागस बालपण. खरं तर तमाशात सादर होणाऱ्या लावणीला आपण महाराष्ट्राची शान म्हणतो. …

तो राजहंस एक…..सेवाश्रम भेटीनंतरचे मनोगत Read More »

वास्तुशिल्प रेसिडंसी, ठाणे … वुई टुगेदर धान्य बँक आपली ऋणी आहे !

वर्ष २०१८… पहिली भिशी आम्हाला लागली – मला आणि माझी मैत्रीण मनीषा कदम हिला.भिशीच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या सोसायटीतल्या मैत्रिणीच्या सोबतीने भिशिला नवं स्वरूप द्यावं असं दोघींच्याही मनात होत.खूप जगलो स्वतःसाठी आता समाजाचे ऋण मान्य करून छोट्या स्वरूपात का होईना त्याची थोडी उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी मनापासून ही इच्छा होती.आणि म्हणतात ना pure intention …

वास्तुशिल्प रेसिडंसी, ठाणे … वुई टुगेदर धान्य बँक आपली ऋणी आहे ! Read More »

शांतिवन : दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथेकर माझे जुळती

वुई टूगेदर ग्रुप मध्ये आल्या पासूनच  शांतीवनला जायचं प्रत्येकीच्या मनात होतच, उज्वला ताईकडून खूप ऐकल होत. म्हणूनच पटकन १७ जणी तयार झाल्या. प्रत्येकीला दिपक दादा आणि कावेरी ताईंना भेटायचं होतं, प्रकल्प बघायचा होता. मग काय  निघाल्या साऱ्याजणी मिळून शांतीवनला ८ तासाचा प्रवास करून पोचलो, ४वाजता! पाऊल टाकताच जाणवलं ते स्वच्छ, प्रसन्न करणार आनंदी वातावरण. कावेरी …

शांतिवन : दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथेकर माझे जुळती Read More »

संक्रांत पहिला सण – त्या निमित्ताने काही ओळी….

तिळगूळ घ्या गोड बोला  नववर्षातील पहिला सण संक्रांत  दान देऊन धान्यबॅंकेस करु सुरुवात धान्याचे देउन वाण  करू साजरा सण झोकात  गरजूंना देऊ  मदतीचा हात  ईश्वर आहे प्रत्येकाच्या ह्रदयात  — ऋतुजा कुलकर्णी, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे

वुई टुगेदर धान्य बँक २ डिसेंबर २०१८ वर्धापन दिनानिमित्य काही मनातले

काही बायका जमल्या तर लागतात लगेच गप्पा करायला..स्वैपाक, साड्या, धावपळ, पुन्हा माघारा, तोच गाडा ओढायला! कितीही शिकली सवरली केली जरी नोकरीतरी जेवण ही बनतेच बाईची जबाबदारी !घरच्या सगळ्यांना बांधून द्यावी लागते तिला रोज शिदोरी. सगळ्या व्यापातून वेळ काढून काय करू शकतात ह्या बायका?बाहेर जाऊन सोशल वर्क करणे काय सोपे आहे का? पण काही बायकांनी ठरवले …

वुई टुगेदर धान्य बँक २ डिसेंबर २०१८ वर्धापन दिनानिमित्य काही मनातले Read More »

कृतज्ञता 2018, धान्य बँकेच्या दात्यांना धन्यवाद

प्रत्येक मानवात चांगुलपणा असतोचत्याला हाक मारायची असतेप्रत्येकामध्ये देवत्व हे वास करतेचत्याला साद घालायची असते एरवी माझे तुझे करत भांडणारी माणसेआपले म्हटले की एकत्र येतातमी काय करू एकटा, म्हणत रडणारे हातदिशा दाखवली तर हजारो होतात सरत्या वर्षाने असे अनेक अनुभव दिलेअनोळखी होते ते एका हाकेवर  नातलग झालेतुमच्या सहकार्याशिवाय काहीच शक्य नाहीतुमची साथ असेल तर काहीच अशक्य …

कृतज्ञता 2018, धान्य बँकेच्या दात्यांना धन्यवाद Read More »